श्री गणेशाय नम: . श्री स्वामी समर्थ नम :
In this page I am sharing short poems aiming to summarize stories in Swami Samarth Bakhar by Gopalbuva. I am neither trained in poetry writing nor do I claim any accurancy in my poems in depicting the original stories. This is just my attempt to do Swami seva as inspired by him 🙏
note - this is currently a work in progress
प्रगटले दत्तावतारी । स्वामी होण्या प्रसिद्ध ॥ १ ॥
दृष्टांत पावले पुजारी । आणि अनेक दत्तभक्त ॥
अक्कलकोटास जावे । तिथेच वसे अवतारी दत्त ॥ २ ॥
महासिद्ध गोपाळबुवा । वर्तविले जसे भविष्य ॥
बखरकार म्हणे टोळांचे । भाग्य उजळले विशेष ॥ ३ ॥
मुंज करीन गाणगापुरी । करी विप्र नवस ॥
अक्कलकोटी द्रव्य संपता । प्रार्थी स्वामी चरणास ॥ १ ॥
नवस तो फेडून घेती । तिथेच पूर्णकामी स्वामी ॥
बखरकार म्हणे भक्तहो । तोचि दत्त या भूमी ॥ २ ॥
ठाकूरदासबुवा होते । अनन्य दत्तभक्त ॥
दैवयोगे झाले त्यांचे । सर्वांग श्वेतकुष्ठ व्याप्त ॥ १ ॥
गाणगापुरी दृष्टांत होता । आले अक्कलकोट धामी ॥
नवसाची कस्तुरी मागून । घेती कौतुके हो स्वामी ॥ २ ॥
काष्ठ जळके देऊनी । स्वामी कुष्ठ निवारती ॥
पुढे गुरुनाथ नावाचा । उत्तम पुत्र ही दिधती ॥ ३ ॥
गुरुपदेश-इच्छा स्वामी । अंतर्साक्षी ओळखती ॥
बखरकार म्हणे बुवा । राहिले स्वामी सेवेसी ॥ ४ ॥
कुष्ठव्याधी एका शरीरी । सेवा करी तो गाणगापुरी ॥
दृष्टांते आला अक्कलकोटी । तिथे स्वामी कृपा करी ॥ १ ॥
"विष्ठा लाव" म्हणता स्वामींच्या । विष्ठेचा केला लेप ॥
चार दिवसांत व्याधी गेली । काया झाली हो निर्लेप ॥ २ ॥
पैसे बुडवले एका बुवाने । समाराधनेच्या बहाणे ॥
स्वामी ऐकती तव । वाईकर ब्राह्मणाचे गाऱ्हाणे ॥ १ ॥
तोच बुवा दाखवून गर्दीत । मिटवती तक्रार वाईकराची ॥
बखरकार म्हणे बोळवण करुनी । पाठविले हो स्वगृहाशी ॥ २ ॥
श्रीधर पोटशूळे आजारी । सेवा करी गाणगापुरी ॥
दत्तगुरु देती स्वप्नी औषध । ज्यात 'पान श्रीपुरी' ॥ १ ॥
अर्थ न उमजता तयाला । जा सांगितले स्वामींकडे ॥
"अरे श्रीपुरी म्हणजे कडुनिंब!" । स्वामी सोडविती सहज कोडे ॥ २ ॥
७. गोविंदराव दृष्टांत कथा
गोविंदराव दत्तोपासक । दृष्टांती पाही स्वामीं गाणगापुरात ॥
विराजमान नृसिंहसरस्वती देवालयात । निजपादुका शोभती पायात ॥ १ ॥
सिद्ध साधू वेदांतनिष्ठ । म्हणती स्वामी दत्तावतार निश्चित ॥
बखरकार म्हणे या जगी । अवतरले हे पूर्ण ब्रह्म ॥ २ ॥
स्वामी मूळ कुळ वर्णाचा । न लागे कोणास पार ॥
सतेज गौर-तांबूस दिव्यकांती । अजानबाहू तेज प्रखर ॥ १ ॥
रागवता स्वामी राजादिकही कापती । पळती मनी धरूनी भीती ॥
बखरकार म्हणे अमृतदृष्टी । सदा लाभे शरणागतांसी ॥ २ ॥
तीर्थे हिंडूनी पावन करिती । स्थापिती पादुका देवलग्रामी ॥ १ ॥
मोगलाईत मठ स्थापिला । चंचलभारती नाम धारण ॥
मंगळवेढी प्रकट जाहले । अक्कलकोटी मग आगमन ॥ २ ॥
वय न जाणे स्वामींचे कवण । पुराणपुरुष हे निश्चित ॥
बखरकार म्हणे दीनदयाळू स्वामी । त्या चरणी आमचा प्रणिपात ॥ ३ ॥
राजूरच्या चंदुलालावर । स्वामींची ही मोठी प्रिती ॥
कौतुके हुशार सेवका । "चंदुलाल" म्हणती ॥ १ ॥
नानारेखींनी मांडली । स्वामी-जन्मपत्रिका साचार ॥
प्रकटले चैत्र शुद्ध द्वितीये । उत्तर देशिका भूमीवर ॥ २ ॥
स्वामीसुतही मानिती । प्रकटकथा ही साचार ॥
बखरकार म्हणे गोड । स्वामीलीला ती अपार ॥ ३ ॥
कलकत्त्याचा गोरा बॅरिष्टर । स्वामींना प्रश्न जो करी ॥
कर्दळीवनाचा प्रवास आपला । स्वामी तयाशी विस्तारी ॥ १ ॥
गाणगापूरचे पुजाऱ्याना सांगती । "मीच नृसिंहभान" जाणा ॥
बखरकार म्हणे हा दत्तावतारच । गुरुचरित्राशी नाते सांगणारा ॥ २ ॥
विष्णुबुवा ब्रह्मचारी वक्ते । वेदान्त कथना आले ॥
स्वामींसमोर गर्वाने । ब्रह्मतदाकारतेचा प्रश्न विचारिते झाले ॥ १ ॥
स्वप्न-विंचू-दंशाचा अनुभव दिला । स्वामींनी धडा शिकविला ॥
खरे योगी अन् पढतमूर्ख । भेद हा तयांसी समजावला ॥ २ ॥
मंगळवेढीचे बाळकृष्णबुवा सिद्ध । स्वामी चरणी नमिती ॥
बखरकार म्हणे खऱ्या भक्तां। दिसे योग्यता अपार ही ॥ ३ ॥
मंगळवेढी गरीब ब्राह्मणा । स्वामी मागती दशमी भोजन ॥
भाकड गाय दुभती केली । न मागता कृपा वर्षली ॥ १ ॥
स्वामी वाक्य हे कामधेनू । चराचर ज्यांच्या आज्ञेत ॥
बखरकार म्हणे स्वामी स्वये । काळजी भक्तांची वहात ॥ २ ॥
कंटक-शय्येवरी स्वामी निजले । पाहुनी भक्ती उपजे बसाप्पा अंतरी ॥
बहु वर्षे केली सेवा । स्वामी प्रसन्न जाहले त्यावरी ॥ १ ॥
वनी निविड सर्प धरिला । स्वामीकृपे झाली सोन्याची लगड ॥
दारिद्र्य निवारिले क्षणात । स्वामीभक्तीचे फळ हे अजोड ॥ २ ॥
भक्तांचे संकट दूर कराया । धावून येती अंतर्यामी ॥
समर्थ चरणी लीन होता । दारिद्र्य ते हरी स्वामी ॥ ३ ॥
बावन्न वर्षांची शूद्र स्त्री ती । बसाप्पा सांगे तिसी॥
स्वामी-सेवा संतानप्राप्तीसी । करी मनी धरुनी भक्तीसी ॥ १ ॥
नित्य करी स्वामी-दर्शन । मगच घेई ती भोजन ॥
प्रसन्न होऊनी स्वामी । वदले - "खा चिक-साखर" ॥ २ ॥
उत्तम संतान तिज दिधले । सुगम केले तिचे जीवन ॥
बखरकार म्हणे स्वामी-लीला । हाचि चमत्कार महान ॥ ३ ॥
बाबाजी भटाच्या घरात । पाणी नव्हते त्या आडात ॥
स्वामींनी पाणी मागितले । बाहेरून आणण्या तो निघत ॥ १ ॥
“घरातच आहे पाणी” वदले । स्वामी आशीर्वाद तो देती ॥
केली लघुशंका त्या आडात । पाणी तुडुंब भरले सत्वर ॥ २ ॥
भक्ताची तृष्णा भागविण्या । अगाध लीला ही दाविली ॥
बखरकार म्हणे ठेवा भाव । तुम्हाही कृपा लाभेल ॥ ३ ॥
मंगळवेढी तंतुकार एक । दारिद्र्य दुःखे होता पीडित ॥
स्वामी भक्तांचे रक्षक । सकल कष्ट त्याचे हरत ॥ १ ॥
तुळशी वृंदावनापाशी घरातल्या । पित्याचे द्रव्य होते पुरले ॥
गुप्त धनाचा मार्ग दाखवून । दारिद्र्य त्याचे निवारिले ॥
स्वामी कृपा होता तंतुकारा । सव्य चरण त्याने धरिले ॥ २ ॥
बखरकार म्हणे स्वामीकृपे । दैन्य न उरे कधी भक्तापाशी ॥ ३ ॥
बाह्यात्कारी पिशाच्चवृत्ती । परी अंतरी ब्रह्मतदाकार ॥
मंगळवेढीचा यवन तारिला । स्वामी ज्ञानी कृपासागर ॥ १ ॥
देव मामलेदार सेवा करती । राहुनी पहा स्वामीसह ॥
बखरकार म्हणे योग्यता पाहुनीच । भक्तांवरती होई अनुग्रह ॥ २ ॥
स्वामी मठात निजले असता । लावुनी कडी रामदासी गेले ॥
लोकां दिसले स्वामी नदीतीरी । रामदासी चकीत भारी जाहले ॥ १ ॥
चळांब्यास हा विनोद घडला । परब्रह्म बंदीस्त करण्याचा ॥
बखरकार म्हणे भक्ती हाची उपाय । स्वामींना प्रेमे बांधण्याचा ॥ २ ॥
स्वामी विराजती नदीतीरी । मंगळवेढी डोंगरपायरी ॥
दिव्य पुरुष दोन भेटी येती । तिथे पहा स्वामींजवळी ॥ १ ॥
त्यांचे झाले जे संभाषण । न मुळी उमगे उपस्थित गण ॥
बखरकार म्हणे सामान्य जनासी । पुरे फक्त स्वामी नामस्मरण ॥ २ ॥
21
हुमणाबादेस माणिकप्रभु-सन्निध, स्वामी दर्शन लाभे सबनीसांना |
“दर्शन घे, हेच तुझे गुरू", माणिकप्रभु सांगती तयांना || १ ||
स्वामी स्वतः कृपा करिती, अक्कलकोटी जाण्या सुचविती |
येता स्वामी अक्कलकोटी, सबनीस लागले चरणापाशी || २ ||
पुढे आणखी विनोद घडला, पंढरीनाथाचा जोडा स्वामींनी नेला |
शंका येता परत दिला, अन मंगळवेढा कायमचा सोडला || ३ ||
22
मोहळास पुराचा ओसरला जोर, नदीपार जाता लागले स्वामीचरण
गवेस्वामींस दिधले दर्शन, सुटले तयांचे दुर्गम योगाचरण
हट्टी कोष्टयाचा हट्ट ब्रह्मदर्शनाचा, भ्रमिष्ट झाला रागवता स्वामी
गवेस्वामींनी करुणा भाकता, कोष्ट्यास पुर्ववत करिती स्वामी
23
विटाळ होतो” म्हणुनी सोहनींच्या, घरातूनि निघती स्वामी |
वासना-विषय सोडण्या सांगती, परी न ऐकती सोहनी ||
संकट आले नोकरीवरी, आज्ञा मोडता दु:ख पावले |
शरण येता कृपेने तरले, स्वामींचे ऐकता ऐश्वर्य पावले ||
24.
सोलापूरी दत्तमंदिरी स्वामी दर्शन जाहले चिंतापंत टोळांस
सर्वज्ञ स्वामी जाणूनी, स्वगृही नेले अतीप्रेमे भोजनास
पुढे एकदा स्वामी आचरणी, शंका आली टोळांच्या मनी ।
स्वामी जाती तडक निघोनी, मग पश्चात्तापे लागती चरणी ॥
स्वामी भोजनी थांबती टोळांचे पुत्र, जरी उशीर झाला जाण्या कचेरीत
स्वामी सहज दाखविती चमत्कार , स्वाक्षरी उमटवती त्यांची
हजेरीपटात
25.
टोळ बनले अक्कलकोटचे कारभारी, संगे येण्या स्वामींना विनंती करी
“उन्हाळा आहे , पाऊस पडल्यावर येऊ” उत्तराती साक्षात्कारी
कार्तिकमासी दिपावळी नंतर मालोजीराजे बसती गादीवर
मग अक्कलकोटचे भाग्य उघडले, स्वामी तेथे राहण्या आले
26.
टोळांसंगे अक्कलकोटी लिघाले स्वामी,परी रस्त्यातच गुप्त होती
शोधता दिसे खंडोबा मंदिरी , स्वामी बैसेले होते निवांती
तीन दिवस निराहारी स्वामी, मनुष्य देहात परी अवतारी
स्वामी लीला अपारी, तुम्ही आम्ही काय जाणणार थोरी
रहसिलदार मुसलमान विनोदे, रिकामी चिलीम करी अर्पण
ओढता धूर येई बाहेर, उमगे अवलिया हा विलक्षण ||
चोळाप्पा घरी भोजना नेई, स्वामी मुसलमानहस्तेच ताट घेई
चोळाप्पास लाभले निधान, परीक्षेत घेती अनेक परी त्यास वाटे समाधान ||
27.
अनेक क्रीडा करिती स्वामी चोळाप्पा घरी , परीक्षा पाहण्या भक्ताची त्रास देती नाना परी
मालेराजांनी धरता मनात शंका , तात्काळ प्रकटती स्वामी समोर कवतिका
पुढे राजा हाती देऊन तलवार आणि पिकदाणी
स्वामींनीच दाविली त्यांना, भविष्याची ही निशाणी।
28
राजवाड्यात देवघरासमोर, स्वामी विराजती झोपाळ्यावरी
उंदरांचा त्रास होई गाभाऱ्यात, पुजारी खोड मारी एकावरी ॥
स्वामी दयाळू अति कनवाळू, संजीवनी देती त्यास
"बेटा जा" म्हणता उंदीर झाला, जिवंत पुन्हा खास ॥
29.
गुरुप्रतिपदेच्या उत्सवासाठी, राजा गाणगापुरास जात
नृसिंह स्वामी दृष्टांत देत , “मी आहे तुझ्याच गावात" ॥
राजा स्वामी चरणी लागला, पादुका पूजेत स्थापिल्या
गुरुप्रतिपदेची थोर वारी, अक्कलकोटीच मग सुरू केली
30
टाकला विहीरीमध्ये सोन्याचा जो चौफुला,
काढता बाहेरी दुसऱ्या दिवशी, तो सुकाच दिसला!
स्वामी सामर्थ्य अगाध, किती वर्णावी त्यांची लीला!
31.
स्वामी काटक्यांच्या राशी करी, लक्ष्मी तोफेत डोके घाली
चितोपंत टोळांघरी स्वामी अगम्य लीला करी ||
पुढे होता बंड आणि हत्या मग लोक उमगती सत्या
प्रत्येक स्वामीकृतीत असे गर्भीत अर्थ , परी सामान्य जन तो समजण्या असमर्थ ||
32.
महाराजांच्या आगमने, भाग्य अक्कलकोटचे बदलले
गाड्या घोडे, बाजर धंदे शतपटीने ते वाढले||
आर्त, जिज्ञासू , अर्थार्थी आणि ज्ञानी सर्व स्वामी दर्शना आले
ज्याच्या त्याच्या योग्यते प्रमाणे स्वामी कृपा प्राप्त झाले ||
भक्तागणिक अनेक चमत्कार स्वामींनी केले ,
योग्य भक्ता कधीच न विमुख पाठवले ||
स्वामी सहवास, स्वामी आरती , स्वामी सेवेत सुख पावले
भाग्यवान ते प्रेमळ भक्त जणू नंदनवनाचे सुख पावले||
33.
पाहून समर्थांचा तो राग, करी टीका एक अभाविक
त्यासी न उमगे तो कोप, असे केवळ क्षणिक ||
राव असो वा रंक, स्वामी सर्व भक्तांचे रक्षक
जरी कोपले ते साच, तर कोण असे ताराया समर्थ? ||
34.
राजा हत्तीवरून दर्शनास आला, स्वामींच्या प्रकोपे श्रीमुखात पावला
राजा वा रंक स्वामींना सर्व समान, जगत्पालकापुढे व्यर्थ मानवाचा अभिमान ||
35
गणपतराव जोशींचा गडी, कडुनिंबांची फांदी तोडी
“कोण तोडतो माझ्या पालखीची दांडी?” संतप्त स्वामी सवाल करी
उकिरड्यावर बसती स्वामी निवांत , गांधीलमाशी कान पोखरी वाहे रक्त
स्वामी लीला विचित्र अन अर्थपूर्ण, अचंबित होती सदैव भक्त
36.
मालोजीराजांस दोन कन्यारत्ने, मग पुत्रप्राप्ती झाली
सर्वज्ञ स्वामी कृपेने लोकां, प्रचिती भविष्याची आली||
सर्वशक्तिमान, सर्वश्रेष्ठ ते, त्यांना काय अशक्य
त्यांच्याच हाती भक्तांचे वर्तमान, भुत आणि भविष्य ||
37.
दोन डोक्याचा माणूस" म्हणती ज्या भीमरावास
कंटाळूनि व्याधीस येई शरण स्वामी चरणास ||
स्वप्नी दर्शन देऊनी निवारले त्या रोगास
तीर्थ-अंगारा लावता, लाभे आरोग्य भीमरावास ||
38.
बर्वे कारभारी चोळाप्पा पुत्राची थट्टा करी
परी स्वामी महाराज रागवता क्षमा याचना करी||
स्वामी न आधीन कोणापरी , जरी चोळाप्पा स्वामी सेवा करी
अंतकाळीही दर्शनास मुकला , द्रव्यलोभे स्वामीकृपेस दुरावला||
39.
स्वामी निद्रीस्त घोरती जोशींघरी, पाहून शंका टोळां-मनी
योगेश्वर तो निद्रेतच उत्तर देई , खेळ जागृती निद्रेचा दावाया जनी
40.
महाराज निजले गादीवरी, पाहून पुराणिक निंदा करी ।
स्वामी नेती तया डोंगरावरी, कडब ग्रामाच्या कडेवरी ॥
रात्र अंधारी, थंडी भारी, स्वामी पहुडले खडकावरी ।
गादी-पाषाण स्वामींस सारखे, पुराणिक उमजे चूक अंतरी ॥
41.
राजवाड्यात स्वामींची असे कधी कधी वस्ती
बाहेर जमे अपार गर्दी , प्रत्येका स्वामीकृपेची आसक्ती ||
साधु , भोंदू , धुर्त -कपटी, सर्व स्वामी भेटी येती
स्वामी प्रत्येका परक्षिती , योग्य भक्तांवरच कृपा करती ||
42.
कबीरपंथी भजनी बुवा ढोंगी, परस्त्रीसंगे घरी रंगला
स्वामींनी बिंग फोडताच, तो गावाबाहेर पळाला।।
स्वामींना ना आवडे लोक, जे आळशी अन अधीर
भक्तांना सांगती “उतावळा सो बावळा, धीर सो गंभीर”।।
43.
शिश्नोदरीच्या सेवेत अडकले जीव, ज्ञान उमगणे कठीण फार
गुरूभक्ती हाच उपाय , तोच सामान्य जना तरणोपाय ||
बाळाप्पास करून हाच निर्देश, स्वामी उपदेशी सर्व भक्ताकरी
भजो हो स्वामी गुरूवरी, तो कनवाळू आला आम्हा तारणहारी ||
44.
मुंगी पैठणची विठाबाई, पंढरी जाण्याचा करी विचार
महाराजांचे दोन सेवक, सोबती जाण्या झाले तयार ||
राजवाड्यात भेट होता, स्वामी तिची थट्टा करी
प्रत्यक्ष परब्रह्म जवळी जाणून, पंढरीचा बेत ती रद्द करी ||
45.
परशुराम सेवेकरी काशीस जाण्यासी आज्ञा मागत
“संतचरणीची माती तीच माझी भागिरथी” स्वामी उपदेशत ||
चोळाप्पा बाळाप्पालाही संकेते स्वामी हेच सागती
गुरूचरणी सर्व तीर्थे, हा सोपा मार्ग स्वामी दर्शवती ||
46.
गयाबाई रामाचार्यांची पत्नी, पुत्रप्राप्तीस्तव स्वामींसी प्रार्थी
“होईल ग होईल” स्वामी वदती, आश्वासूनी तिज धीर देती ||
पुढे जाहली पुत्रप्राप्ती, वय जेव्हा पंचेचाळीस
भक्तांच्या पुरवी इच्छा, स्वामी कृपाळू जणू तो परिस ||
47.
क्षयरोग पत्नी कृष्णरावांची, पुत्रकाम्ये स्वामीप्रती प्रार्थी
“बोरीस प्रदक्षिणा” घालण्यास, समर्थ तयेसी आज्ञापिती ||
स्वामीसुत मठात सेवा करिता, इच्छा पूर्ण होई
भक्ताचे बांळंतपण कराया, स्वामी माऊली स्वतः जाई ||
48.
महारवाड्यात असता स्वामी, वाणी स्री विनवी पुत्रकामी
देता हाड प्रसाद म्हणूनी , न स्विकारी विटाळ मानी ||
पुत्र पाविली महार स्त्री, जो तो प्रसाद मागुन घेई
अगम्य लीला स्वामी माऊली, भक्तांची ती कृपाळु आई ||
49.
गाणदेवीचे महत्व बुडवी, परब्रम्हच खरे हे कृतीने सांगी
श्रीगुरुभक्तीची महती स्वामी सामान्य जनांना शिकवी ||
50.
बाळकृष्णबुवांना रामदासी ,त्यांस स्वामी रामनाम संभाळण्या सांगती
अनेक भक्तांची उपास्य साधने , स्वामी पवित्र करून देती ||
अनेक देवता अनेक उपासना, सर्व मार्ग स्वामींकडेच जाणार
“कलो श्रीपादवल्लभम “ वचन सांगे, कलायुगी स्वामीच आम्हा तारणार ||
51.
घुबड शिरले घरात, म्हणून चोळाप्पा घर सोडी
भ्रम-अज्ञान नको हे, स्वामी त्यासी रागे भरी ||
बाललीला अगाध स्वामींची, चोळाप्पाच्या घरी
सोवळे-ओवळे ना मानिती, भलत्या वस्तू दान करी ||
परिक्षा नित्य चोळाप्पाची, स्वामी जाणोनी अंतर्याम
पारखूनिया जवळ करिती, स्वामी भक्तांचे विश्राम ||
52.
गर्भार चोळाप्पा-पत्नी जिथे निजली, तिथेच स्वामींनी मडक्यांची उतरंड पसरली
प्रसूती क्षणी परी द्वार लावुनी, लाज तियेची राखली ||
हात घालता स्वामी-जोड्यात, उतरल्या तीच्या विंचू दंशाच्या वेदना
चोळाप्पाच्या घरी स्वामींनी, अद्भुत लीला केल्या नाना ||
53.
चोळाप्पाची मेव्हणी रडत स्वामींकडे येई, नथ हरवल्याने ती दुःखी होई ,
सर्वसाक्षी स्वामी चोरास दरडाविती, नथ परत करण्यासी सांगती ||
अक्कलकोटी सर्वांची काळजी स्वामी वाही,
पोलीस, न्यायाधीश, रक्षक व पालक स्वामीच होई ||
54. wip
लिंबाच्या झाडावरील एक चिमणी, स्वामी आज्ञेने तेथेच बैसली ।
पक्षीही स्वामी आज्ञा पाळती, बघून चोळाप्पाची भक्ती स्थिरावली ॥ १ ॥
गहाण ठेवुन भांडी जोवर चोळाप्पा जेऊ घाली, स्वामी तेथेच सदैव भोजन करीती
राज शिघा प्राप्त होता मात्र, स्वामी जेवती गावात भक्ताघरी
गहाण ठेवून भांडी जोवर, चोळाप्पा स्वामींना जेऊ घाली ।
राज शिधा प्राप्त होता मात्र, स्वामींची पावले गावाकडे वळाली ॥ २ ॥
जेथे जाती स्वामी तेथे चोळाप्पा जाई, सोडील घरदार इतकी स्वामीचरणी प्रिती
स्वामी त्यावर प्रसन्न होती , नीत्यपूजेस आपल्या वहाणा देती ।।
55.
आप्पासाहेब माने कन्या होती रुपवंत, योग्य वर मिळेना म्हणून ते चिंतेत
स्वामी चरणी जातां स्वामी आश्वासती, बडोद्याचे राजे वरतील सांगती ||
पुढे आप्पासाहेब विषमज्वराने ग्रासले , स्वामी दर्शना मुकले , बेशुद्ध पडले
भक्तवत्सल स्वत: धावूनी आले, पाय फिरवुनी रोगमुक्त केले ||
56.
वडिलोपार्जित जमीन, बंडोबा पुराणिक मागती,
परी शहाजीराजे तयांचे, बोलणे नच ऐकती||
केली प्रार्थना स्वामींना, पुराणिकाने अंती ,
"दिधले लिंग तुला" असे, स्वामी संकेते सांगती ||
पुढे मिळे जमीन शिरवळी, तिथे असे रामेश्वर लिंग,
स्वामी वचन चुकणे अशक्य ,हेच सांगे हा प्रसंग! ||
57.
वामनबुवा बडोदेकर दत्तभक्त, शोधती सद्गुरू योग्य अनुग्रहार्थ
पुण्यात तेजपुंज ब्राम्हण सांगी , जा अक्कलकोटी आहेत स्वामी समर्थ ||
अक्कलकोटी येता स्वामी कृपा झाली, गाणगापूरीही दत्तात्रेयांनी स्वामी सेवेचीच आज्ञा केली
बडोदेकरांचे भाग्य उजळले, मातृसेवा आणि स्वामीभक्ती करत समाधानी राहीले ||
58.
Wip
सरस्वती सोनारीण , महाराजांवर श्रद्धा पुर्ण
जरी बाह्यरुपे बावळी परी अंतरी भक्ती थोरी
स्वामींची तीच्या वर होती कृपा, काही स्वामीवाक्यांचा ती सांगे अर्थ सोपा
रागावले असता स्वामी , तीच्या भजनाने हसती
59.
पुण्याचे कर्वे जेंव्हा स्वामींची ज्ञाती विचारी,
“यजुर्वेदी ब्राम्हण, नाम नृसिंहभान , काश्यप गोत्र” असे स्वामी विस्तारी ||
प्रश्न करिती स्वामीं जाती, परी घरी कन्या असे दुराचारी ,
सर्वज्ञ स्वामी रागे भरी , परी शरण येता कथन भविष्य करी ||
60.
रंगपंचमीच्या दिवशी, स्वामी होते टोळांच्या सदनी,
राजदरबारी आले बोलावणे, परि “जाऊ नको” वदली स्वामीं वाणी ||
दरबारात झाली बाचाबाची, तलवारी उपसून प्राण घेण्याची झाली तयारी,
समर्थ भक्ताला रक्षी , टोळांवरील संकट निवारी. ||
81
wip
82
wip
83
माटे विद्वान दुराभिमानी,त्यांनी दुषिले किर्तनी स्वामींसी
संन्यासी-बोधें उमजली महती, पावले तेची पश्चात्तापासी ||
शरणागतावर ठेवती दयाळू स्वामी नेहमी दृष्टी कृपेची
भागवत सप्ताही देती माटेंना सेवा दुर्लभ स्वचरणांची ||
84
आमटी, कडबोळी, भजी अन् क्षिप्रा
स्वामी कौतुके सांगती नैवेद्य एका विप्रा ||
न जेविताही वर्णिती प्रत्येक त्या चवीला
“जाणून करावे कर्म” असा बोध त्यांनी दिला ||
85
नवस बोलला एक जो भाविक व्यापारी
अर्पिली त्याने डाळिंबे, परी सुंदराबाईं अपहारी ||
अस्वस्थ भक्तांना स्वामी म्हणती "रहा स्थिरी"
सुंदराबाईंना मात्र स्वामींनी केले सेवेतून दूरी ||
86
पोटदुखीने बेजार बाई आली स्वामीं चरणी
"विधवा होता होशील बरी" वदली स्वामी वाणी||
वदले जसे स्वामी तसेच घडे तिचे प्रारब्ध
स्वामी लीला असती अगम्य आणि अगाध||
87
पंचभूतात्मक हा देह, वस्तू त्यातली 'आत्मा' निर्गुण
वेदान्त सांगे सामान्य महिला, वटवृक्षाला पुसून जाण ||
संतसंगती होई सुलभ, वस्तुसाक्षात्कार जरी दुर्बोध
स्वामींचे बोलणे अतिगहन, साध्या प्रश्नातून लाभे बोध ||
88
साठ वर्षांच्या माटेबाई, संतान विना त्या अति व्यथित
शरण येता स्वामी चरणी, श्रीफळ प्रसादे पुत्र प्राप्त ||
माटेबाई थोर पुण्यवंत, आणि पूर्ण त्या स्वामीभक्त
लीला ऐकता स्वामींची, अश्रू येती नयनीं सतत ||
89
केसीगावचा अप्पा पाटील, घाली भक्तांना जेवण,
गर्विष्ठ तो तालुकदार, देई त्यास खोटे दूषण ||
भक्तावरी संकट येता, स्वामी समर्थ ते निवारती,
त्या तालुकदारा आठवड्यात, दुष्कर्माची शिक्षा देती ||
90
दाजिबा भोसले आणि साथीदार, झाले अती उन्मत्त
राजेसाहेबांच्या मर्जीतले, छळली प्रजा अत्यंत||
सज्जन-बोध झिडकारला, स्वामी आज्ञेचाही अव्हेर केला
कोपता स्वामी सर्वस्व बुडाले, संस्थान बघा खालसा झाले||
91
चिमाबाई रास्ते लहान मुलगी , दृष्टी हरपली येता सारा
उपाय सारे हरता शेवटी स्वामी चरणी घेतला आसरा||
साखर विहीरीजवळ होते स्वामी त्यांनी तत्काळ केली कृपा
मांजराचे दूध सात दिवस लावता दृष्टी जाहली निकोपा||
92.
स्वामी सेवेसाठी आला नरसाप्पा कानडी
भाषा न ये परी राहे स्वामी संनिध्ध आवडी||
“गीता वाच” स्वामी वचन कानडीत दिसे जरी लिपी होती मोडी
वैकुंठ दर्शन घडवून आणती स्वामी, नरसाप्पाचे भाग्य थोर!||
93.
वामनबुबा कंटाळले कारण बळकावल्या अनेक व्याधी
जीव देण्या निघाले परी स्वामी परावृत्त करिती||
हस्तस्पर्श होता स्वामींचा दूर झाले सर्व रोग
अक्कलकोटी येता संपला उरला सुरला भोग||
दुष्काळातही स्वामीकृपे सर्व गावकरी पुरणपोळीचे जेवती
प्राणायामी वामनबुवांना स्वामी गुरुसेवेचा खरा मार्ग दर्शविती||
94.
वामनबुवा येता स्वामीं दर्शना ,हाकलून देती करून नृसिंह गर्जना
परत बोलावुन शंका निवारती स्वामी भक्तापारखुन मग कृपा करती.||
“समुद्र भरला हवे ते घ्यावे, शेत पिकवुन खावे”
स्वामी उक्ती परमसत्य, भक्ती करुन अमाप लाभावे ||
95.
मुखातील तांबुल देऊन वाचा, दिली मुक्या विप्रास
"बोडकी झाल्यास पोळ्या भाजशील", वदले एका स्त्रीयेस ||
ज्याची जशी कर्मे तशी, कृपा करिती स्वामी
विधिलिखित बदलणे सहज शक्य, प्रत्यक्ष त्रिमुर्ती स्वामी ||
96.
सावंतवाडीचे भोसलें, पत्नीच्या पायास जडली व्याधी
वाटदरीच्या डोंगरावर होता भेटी, स्वामीचरणी माथा ठेवती ||
गाद्यागिरद्या वैभव स्वामी नाकारती, पण रोग निवारणा त्वरित औषध देती
स्वामी तेजे भोसले चकीत होती, नेहमी स्वामी दर्शना येती ||
97.
स्वामी जेवेनात एकदा म्हणून भोसलेंही उपाशी राहिले
मग पाच वाजता संध्याकाळी कनाती लावून भोजन केले||
“मला काय भेट आणलीस?” स्वामी भोसलेंच्या कुटुंबास म्हणाले
मग पसाभर हरबरे ओटीत घालून दोघांनीही घरी पाठवले ||
98.
मैंदरगीचा पांडू सोनार कर्जात बुडाला
स्वामी भक्त असूनही दागिन्यांना सोन्याचा मुलांमा दिला.||
फटाक्यांची शिक्षा होता पश्चातापी स्वामी धावा केला
मामलेदाराकडे प्रत्यक्ष जाऊन स्वामींनी त्याला वाचवला||
99.
मैंदरगीचा जमादार, त्याने कैदी पळतां स्वामींचा धावा केला
स्वामीकृपे कैदी खंदकी मिळाला, जमादार नोकरी सोडून स्वामी पायी आला ||
स्वामींनी जोडा टाकला, तो नेऊन त्याने गावी पूजिला
स्वामी कृपे प्रसिद्ध झाला , आमरण स्वामी सेवेत राहिला||
100.
रावजी पाटील-विठाबाई , स्वामी भोजनाचा नवस करी
दर्शनासी भक्त जमले अपार, रावजी चित्ती चिंता भारी ||
स्वामी कृपेने नवल जाहले, 'अन्नपूर्णा' पूजन करविले
चाळीस जणांची होती तयारी, जेवले तेथे चार हजारी ||
101.
भगवंतआप्पा सुतार इच्छिती, स्वामी उच्छिष्ट प्रसाद
मळ्यावरी तो नेई स्वामींना, भक्ती मनी ती अपार ||
चार पानांची अल्प सामग्री, पन्नास जन हो जेवले
चुळांच्या जळाने अग्निहोत्र, स्वामींनी प्रज्वलित केले ||
ब्रह्मस्वरूप स्वामी समर्थ, काय अशक्य तयांना
अक्कलकोटीचा पूर्णब्रह्म हा, तारी सकल भक्तांना||
102.
बसलगावी गेली भक्तांसह स्वामींची स्वारी,
मळ्यात बसुनी, ग्रामदेवीला निरोपण्याची आज्ञा करी ||
शिंपी अर्पे नैवेद्य, पन्नासांच्या तयारीत पाचशे जेवले तृप्त,
भक्तवरद स्वामींनी समंध घालवूनी, केले तया मुक्त ||
103.
समर्थ भजनी आनंदी जयाजीराव शिंदे आणि गोविंदास्वामी
त्याकरता राजवाड्या बाहेर येऊन दर्शन देती स्वामी ||
स्वामी प्रश्नावर परमहंसाची लक्षणे सांगती गोविंदबुवा
स्वामी हसुन आणि थोडे रागावून बोलवणं करती तेधवा ||
दादुमिया मुसलमान त्यासी,
स्वामी मागती भाकरी आणि बेसन ||
प्रसाद पाहुन गोविंदबुवा लज्जित झाले ,
परमहंसांचे वागणे प्रत्यक्ष कृतीने स्वामींनी शिकवले ||
104.
सोलापूरचे बापुराव स्वामी भक्त, अक्कलकोटची करती वारी
स्वदु:खे पिडीत दोन माणसे होती प्रवासात बरोबरी ||
एका लग्न तर एका नोकरीची इच्छा , मनात असे परोपरी
म्हणे कार्य साधले तरच म्हणू , अक्कलकोटचे स्वामी अवतारी ||
अंतर्यामी स्वामी सर्व जाणती , शंका घेतली म्हणून रागे भरती
शरण येताची प्रसन्न होती कृपाघन, इप्सित कार्य त्यांचे पुर्ण करिती ||
105.
सप्तशृंगी मातेच्या मुखीचा तांबुल वामनबुवांना दिधला
पंढरपूरी पांडुरंगे गंगाजळीचा स्वीकार केला ||
अक्कलकोटी अंतर्रयामी स्वामींनी यात्रा वृत्तांत कथिला
सर्वत्र एकच स्वामी' असा प्रचितीचा भाव दाविला ||
106.
स्वामी चरणी असती नाना प्रकारचे लोक
काोणी सात्विक तर कोणी उद्दाम हिंसक ||
कानफाट्या लोकांची डोकी फोडी, पोलिसांनाही ना आवरी
तोच स्वामी पलंग वाहे शिरी , स्वामी विष्ठा ही भक्षण करी ||
107.
चैत्र वद्य अकरा प्रात:काळी, वामनबुवा इच्छिती स्वामीस्नान गंगाजळी
स्वामी आज्ञेने पूजा करिती, रेशमी वस्त्रे अर्पण ती करिती ||
कीर्तन मांडले सायंकाळी, परी स्वामी नैवेद्य मागती त्याच वेळी
भक्तांवरी स्वामी सदा प्रसन्न, सेवा घेती स्वतःच करवून ||
108.
एक दरिद्री ब्राह्मण बाई, स्वामींना नैवेद्य घेऊन येई
मनात चिंती जवळी न येई, दाद न तिला कोणी देई ||
“भटणीचा नैवेद्य कोण अडवतो?” अचानक स्वामी गर्जना होई
अंतर्साक्षी तो दयानिधी , नैवेद्य स्विकारुन पुत्र तीजला देई ||
109.
wip
काकासाहेब वासुदेव, स्वामींचे भक्त अनन्य
कापरगावी येता स्वतः स्वामी येती तेथे भक्ता ओढी
उन्मत्त हत्ती स्वामी करीती शांत , सर्व संकटी भक्ता रक्षती स्वामी
स्वामी सर्वज्ञानी दाखवती खेळ अनंत , त्याचा अर्थ क्वचितच उमगे भक्ता सामान्य
काकासाहेब वासुदेव अनन्य भक्त, स्वामींचे लाडके ।
कोपरगावी धाव घेतली, स्वामींनी करुणेके ॥१॥
उन्मत्त गजही शांत जाहले, स्वामींच्या एका दृष्टीने ।
निवारीली सर्व संकटे, भक्तांच्या रक्षण-वृत्तीने ॥२॥
खेळ मांडिला अगाध त्यांनी, अक्कलकोटीचे स्वामी ।
सामान्य जीवासी उमगेना, त्यांचे गूढ अगामी ॥३॥
110.
सोवळ्या-ओवळ्याचे स्तोम करी जानकीबाई फार
स्वामींना नैवेद्य-स्वीकाराचा आग्रह करी अपार ||
स्वामी उघड करती तिचा व्याभिचार, सांगती पुढे कुष्ठ होणार
स्वामीवाक्य बदलणे ब्रम्हदेवा अशक्य , सामर्थ्य त्यांचे अगाध थोर ||
111
पोटशूळाने त्रस्त विप्र, नरसोबाच्या वाडीस बोले नवस
दत्तकृपेने होई व्याधी मुक्त, परी नवसाचा पडे विसर त्यास ||
अक्कलकोटी येता समोर, स्वामी तयासी रागे भरी
फेडून घेई पेढ्यांचा नवस, सर्वज्ञ स्वामी दत्तावतारी ||
112.
वामनबुवां तीर्थयात्रे गेले, स्वामींसाठी विविध सामान जमविले
पदक देण्या जरी विसरले , सर्वातंर्यामी स्वामीनी मागून घेतले! ||
“कुत्र्यांना तुकडे घाल!” स्वामी वदले
दसर्यावरी अक्कलकोटी रहाणे सुचीत केले ||
स्वामी आज्ञेशिवाय गाणगापूरी जेव्हां केले प्रयाण
चिखलात रुतले मार्गी , शेवटी स्वामींनीच वाचवले प्राण! ||
113.
सर्वत्र , सर्वज्ञ , सर्वश्रेष्ठ स्वामी,
लीला दाविती अनेक हरेक दिनी||
पांडुरंग केशवा देती साताऱ्यात दर्शन ,
लख्याने खाल्ला गुळ म्हणून करती रोदन ||
114.
“वाळकेश्वरा होते पंचवीस वर्षे” स्वामी सांगती दामोदरजीते
अंतर्साक्षी स्वामी तरी अनेक प्रश्न विचारती बहुजन साचे ||
जसा समोरचा तसे उत्तर असे स्वामींचे
परी मुक्तीची ओढ भासे एखाद्याच विरळागताते||