शुभ्रगिरिशिखर अतिरम्य परिसर,
नदी वाहते जल ते निळसर..
भव्य वृक्ष तो अति पुरातन,
तया तळी विराजे हा दयाघन
वज्रसुकोमल तनु दिसे दिगंबर,
आसनमांडी धुत वस्त्र कटीवर
अजानबाहु ते हात मांडीवर
नजर स्थिरावे सुकोमल पायावर
कुठे न दिसतो जरी हा रविकर,
परी प्रभा तयाची चंदनमंडीत तनुवर
मौतिकमणी आणि रुद्राक्षमाळा,
गळा शोभती बघा या विश्वपाळा
तेजोंबर जणू ते मुखमंडल,
विशाल भाळ आणि कर्णी कुंडल
पांढरी दाढी, पांढऱ्या भुवया
शोभुन दिसती या कालातीत यतीया
अपूर्व तेजस्वी नजर विलक्षण
अतिप्रेमळ पण करी परीक्षण
वाटे समोर बसावे असेच काही क्षण
आणि सोडून जावे माझे “मी” पण🙏